हिस्ट्रीशीटर महिलेचा एसपींच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

Jalgaon Jalgaon MIDC आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा हुडकोतील हिस्ट्रीशीटर महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता ही घटना घडली.

शारदा श्रावण मोरे असे या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा गौरव सुरवाडे याचे ११ जानेवारी रोजी कोणीतरी अपहरण केले. या संदर्भात शारदा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, १३ रोजी गौरव हा घरी परतला. तो स्वत:च्या इच्छेने मावशीकडे गेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यानंतरही शारदा यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तीला अडवून जिल्हापेठ ठाण्याच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिस कर्मचारी प्रकाश मेढे यांच्या फिर्यादीवरुन शारदा मोरे हिच्या विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तिच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ती हिस्ट्रीशीटर असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक विलास शेंडे तपास करीत आहेत.