हिंगोण्यातील ‘त्या’ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह…

यावल सिटी न्यूज

हिंगोणा ता यावल > संपुर्ण देशात आणी राज्यात मागील पन्नास दिवसांपासुन थैमान घालणाऱ्या या कोरोना संसर्गजन्य अत्यंतघातक आजाराचे मागील २४ तासात यावल तालुक्यात फैजपुरमार्गाने शिरकाव झाले असुन हिंगोणा गावांतील एक ७४ वर्षीय महिला कोरोना सदृश्य असतांना तिचा सावदा येथे उपचार सुरू असतांना मृत्यु झाल्याने हिंगोणा गावासह तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.

हिंगोणा गावातील राहणाऱ्या एका ७४ वर्षीय सेवानिवृत शिक्षक महीलेस कोरोनाचे लक्षणे दिसु लागल्याने तिला उपचारार्थ सावदा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा दि १५ रोजी मृत्यु झाला होता , तिचे अंतीम संस्कार हे सावदा येथेच करण्यात आले होते , या संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणुन आरोग्य विभाग व फैजपुरचे मंडळ अधिकारी जे .डी . बंगाळे योनी तात्काळ हिंगोणा येथील त्या मरण पावलेल्या महीलेच्या कुटुंबातील पाच लोकांना फैजपुर येथे क्वारेंटाईन करण्यात आले होते . परंतु आज दिनांक 17 रोजी सदर मयत महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *