हिंगोणा येथे शेतकरी हिरामण पाटील यांच्या शेतातील अज्ञात इसमाने पाईप जाळले
हिंगोणा प्रतिनिधी : > येथील वयोवृद्ध शेतकरी हिरामण पाटील यांच्या शेतातील शेती उपयोगी वस्तू कोणी अज्ञात इसमाने जाळून टाकल्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्याचे ३० हजार रूपये कीमतीचे ९५ पाईप जाळले असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमध्ये शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना आला आहे. यासंदर्भात फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.