उत्तरप्रदेश हाथरसच्या तरुणीवर झालेल्या अत्याचार हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलला देण्यात आले निवेदन !

मुक्ताईनगर सिटी न्यूज

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> उत्तर प्रदेश हाथरस येथील अनु जमातीच्या 19 वर्षीय तरुणीवर दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी उच्च वर्णीय आरोपींनी पाशवी बलात्कार केला तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर करून, आरोपींचे नाव सांगता येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीची जीभ छाटण्यात आली तिच्यावर अमानवी,अमानुषपणे अत्याचार करण्यात आले.

सदरची घटना मानवतेला काळिमा फासणारी असतांना ही संबंधित पोलीस प्रशासनाने पिडीत अथवा तिच्या कुटुंबियांची कोणतीही फिर्याद FIR घेण्यात आली नाही शेवटी जनतेने आवाज उठवल्या नंतर आरोपींच्या विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला मात्र,पिडीत तरुणीस योग्य ते औषधोपचार उपलब्ध झाले नाही, प्रशासन स्तरावर पिडीतेला वैद्यकीय सहकार्य केले गेले नाही परिणामी काल सदर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला वरील गुन्ह्यातील आरोपी उच्य वर्णीय असल्याने त्यांना पाठीशी घालण्याच पर्यायाने आरोपींना पाठबळ देण्याचं काम सरकारने केलेले असून सदरची बाब व कृत्य निंदनीय आहे.


मयत व्यक्तीच्या अंतिम संस्काराचे हक्क व अधिकार मयताच्या कुटुंबियांना असतांना संबंधित पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेच्या नावावर पीडितेच्या कुटुंबियांना घरात नजर कैद केली,त्यांना घराबाहेर निघू दिले नाही तसेच आपल्या मुलीचे अंतिम दर्शन देखील घेऊ दिले नाही आणि मध्यरात्री पिडीत मुलीचे अंत्यसंस्कार नियोजीत पद्धतीने पोलिसांनी योगी सरकारच्या मनुवादी राजकीय दबावाखाली केले.

सदर पीडितेचे प्रेत तिच्या आई वडिलांना न देणे हे अनाकलनीय आहेच म्हणून वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा सदर अमानवी कृत्याचा पोलीस प्रशासनाचा व उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध करत आहे.


सदर सरकार उत्तर प्रदेशात मनुवादी व्यवस्था पुन्हा रुजवू पाहत असून संविधानाने दिलेल्या समतेच्या अधिकारांची रक्षा करण्यास कुचकामी ठरत आहे म्हणूनच अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहे.


उत्तर प्रदेश येथील घटनेने महिला आजही सुरक्षित नाही हेच दिसून येत असून समाजात पर्यायाने महिला वर्गात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.


सदरची बाब राज्य व्यवस्थेसाठी लज्जास्पद असून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी असल्याने वरील घटनेतील निर्घृणपणे हत्याकांड करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यासाठी तसेच उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन उत्तर प्रदेश योगी सरकार यांच्या विरुध्द कार्यवाही करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तर्फे मा. तहसिलदार साहेब व पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला प्रसंगी जिल्हा प्रवक्ता ऍड. विनोद एस.इंगळे ,ऍड.दिपेश वानखेडे ,अमोल बोदडे ,शैलेश वानखेडे, मोहन मेढे ,राहुल गणेश ,आकाश इंगळे ,दिपा वाघ उपस्थित होते .सबब सदरच्या निवेदनातून आरोपींना व संबंधित दोषी अधिकारी यांच्या विरुध्द कठोर कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तर्फे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *