रिड जळगाव टीम ::> मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याबाबत विचारले असता पालकमंत्री गुलाबराव पाटील भाजपवर भडकले. भाजप नाहक राजकारण करीत अाहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी अामदार असताना एका माजी सैनिकाला मारहाण केली हाेती; परंतु अाजर्पंत त्यांना अटक झाली नाही. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वत:हून अटक करून घ्यावी, असा सल्ला ही पालकमंत्री पाटील यांनी दिला.