सरकार पाडण्यापेक्षा गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर सांभाळावे !

Politicalकट्टा कट्टा पाचोरा रिड जळगाव टीम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी

पाचोरा प्रतिनिधी ::> राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने ते कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा, असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार गिरीश महाजन यांना लगावला. पाचोरा येथील माजी अामदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांनी त्यांच्या काळात उभारलेल्या शिवतीर्थ या वास्तूचे सुशोभीकरण व खत कारखान्याची नूतन इमारत व यंत्रांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महाजनांनी त्यांच्या मंत्री काळात अनेक आरोग्य शिबिरे घेतले. मात्र, सध्या कोरोना काळात आरोग्य शिबिर घेण्याची गरज असताना ते स्वतः व त्यांचे आरोग्य दूतही गायब झाले आहेत. त्यांच्या काळात सिव्हिलमध्ये केवळ ७ व्हेंटिलेटर होते. आम्ही ही संख्या १००वर पोहोचवून जिल्ह्यात कोरोनाची संख्या आटोक्यात आणली.