जळगावची होणारी बदनामी थांबवा : पालकमंत्र्यांचे आवाहन

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> आशादीप वसतिगृहात काय झाले? याची शहानिशा न करताच विधीमंडळात चर्चा करण्यात आली. जी घटना घडलीच नाही त्यासाठी जळगावला उजेडात आणण्याचा प्रकार घडला.

जळगाव सुसंस्कृत वारसा असलेले शहर असून पुढील काळात बदनामीचा प्रयत्न करू नये, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला.

जळगावात माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, जळगावला सर्वच बाबतीत उजेडात आणण्याचा प्रयत्न काही लोक करतात त्यांनी असा प्रकार करू नये, असे आवाहन करत या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती. त्यानंतर विधानसभेत हा विषय आल्यानंतर स्वत: बाजू मांडली.

जळगावला चुकीच्या कारणांसाठी उजेडात आणले जात आहे. काहीही घटना घडलेली नसताना जळगावला आधीपासून आतापर्यंत बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.

पुढच्या काळात बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण जळगाव सुसंस्कृत वारसा असलेले शहर आहे. अशा घटना जळगाावत घडणार नाही व घडू शकणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

आशादीप वसतिगृहात १७ महिला व मुली राहतात. त्यांचे चारित्र्यहनन होईल. त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने लोक पाहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.