जळगाव : जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांच्या मृत्यूचा दर वाढत असून पालकमंत्री साहेब जरा याकडे लक्ष द्या असा प्रश्न आज आरोग्य सेवा समन्वय समितीच्या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित करून सुविधा उपल्बध असताना देखील काही रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याची परिस्थिती असून ती आटोक्यात आणावी असे प्रयत्न व्हायला हवे अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली.
येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हास्तरीय जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी आ. किशोर पाटील बोलत होते.
