रागातून मुंबईला गेलेली मुलगी टॅक्सीचालकाच्या सतर्कतेमुळे जळगावात परतली

Jalgaon Jalgaon MIDC जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> मास्टर कॉलनीतील १३ वर्षीय मुलगी १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेपासून बेपत्ता झाली होती. दरम्यान, ती रागाच्या भरात मुंबईला निघून गेली होती. तेथील एका टॅक्सीचालकाच्या सतर्कतेमुळे ती रविवारी जळगावात परतली.

दूध घेण्यासाठी घरातून बाहेर पडलेली ही मुलगी थेट रेल्वेने मुंबईला निघून गेली होती. या प्रकरणी तिच्या काकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस तिचा सर्वत्र शोध घेत होते; पण ती थेट मुंबईत गेली होती. तेथे दोन दिवस तीने भटकंती करत काढले. एका टॅक्सीचालकास संशय बळावल्यामुळे त्याने मुलीची विचारपूस केली. तिने आपण जळगावहून आल्याचे सांगितले. त्यानंतर टॅक्सीचालकाने स्थानिक पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर संबधित मुलगी जळगावातून बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या मुलीस रविवारी जळगावात आणून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.