कोठली ग्रा.पं.चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रिड जळगाव प्रतिनिधी >> भडगाव तालुक्यातील कोठली गिरणा नदी पात्रातून काही दिवसांपासुन अवैध वाळुचा उपसा होत आहे. तहसिल प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने तक्रारी करुनही दुर्लक्ष होत आहे. तरी अवैध वाळु उपसा रोखावा. अन्यथा रस्त्यावर आत्मदहन करु या ईशार्याचे लेखी निवेदन कोठली ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेसह इतरत्र दिलेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कोठली गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळुचा उपसा होत आहे. परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी वाळुचे ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना व अन्य ग्रामस्थांना ट्रॅक्टरधारकांकडून शिवीगाळ करण्यात आल्यात, तसेच जीवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या आहेत.
हा प्रकार सुमारे ६ ते ७ महिन्यांपासून सुरु आहे. त्यासाठी गावातील ठराविक ग्रामस्थांना बोलावुन माहीती दिली आहे. तसेच भडगाव तहसिल कार्यालयालाही वेळोवेळी लेखी स्वरुपात ग्रामपंचायतीने तक्रार अर्जही दिलेले आहेत. भेटुन तक्रारीही मांडलेल्या आहेत. मात्र कर्मचार्यांकडून या ट्रक्टरवाल्यांना तक्रार केल्यास माहीतीही मिळते. असेही दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे.
तसेच यामुळे गावात शांततेचा भंग होउन कठीण घटना घडु शकतात. या प्रकारास प्रशासन, शासकीय अधिकारी जबाबदार राहतील. एवढे करुनही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर आत्मदहन करु असा ईशाराही ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राउत, पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील, पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे आदिंना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना कोठली येथील माजी सरपंच दिपक पाटील, गोकुळ मोरे,शिवदास पाटील, दिपक पाटील आदि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.