बहाळ प्रतिनिधी ::> येथील गिरणा नदीत शनिवारी सकाळी वाहून गेलेल्या मुलीचा शोध रविवारी दुसऱ्या दिवशीही लागू शकला नाही. येथील १३ वर्षीय पूनम उखा खैरनार ही मुलगी शनिवारी सकाळी नऊ वाजता कपडे धुण्यासाठी गिरणा नदीवर गेली होती. त्यावेळी ती पाण्यात वाहून गेली होती. रात्री उशीरापर्यंत शोध घेऊनही तिचा तपास लागू शकला नव्हता. गिरणा नदीवरील सावद्याजवळील बंधाऱ्यापर्यंत तिचा शोध घेऊनही तिचा तपास लागू शकला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी देखील सकाळपासून बहाळ गावापासून ते भडगावपर्यंत गिरणा नदीचा परिसर पिंजून काढला. मात्र तरीही पूनमचा शोध लागलेला नाही. मेहुणबारे पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
