जळगावातील गेंदालाल मिलमध्ये २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Jalgaon आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> गेंदालाल मिलमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय अशोक पाटील (वय २८) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली.विजय अविवाहित होता. हातमजुरी करून ताे कुटुंबाला हातभार लावायचा.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आई घरात काम करत असतांना वरच्या मजल्यावर जाऊन येतो असे सांगून तो वरच्या मजल्यावर गेला; मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो खाली न आल्याने आई पुष्पा त्याला बोलवायला गेली असता आतून दरवाजा बंद होता.

त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर विजय याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे आईने जागेवरच हंबरडा फोडला. नातेवाइकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.