गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

क्राईम चाळीसगाव निषेध पाेलिस

चाळीसगाव प्रतिनिधी >> शहर पोलिसांनी पाटणादेवी रोडवर रविवारी दुपारी गावठी पिस्तुल व मॅक्झिनसह दोघांना अटक केली होती. पोलिसांनी दोघांकडून पिस्तूल व मॅक्झिनसह दोन दुचाकी असा १ लाख १४ हजाराचा ऐवज हस्तगत केला होता. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोमवारी दुपारी न्यालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

शहरातील घाट रोड परिसरातील हुडको भागात शेख जुबेर उर्फ साबीर उर्फ बंबईया याच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा पाटणादेवी रोड भागात आकाश कोळी (रा. बेलदारवाडी) व भूषण नवगीरे (रा. आदित्यनगर) या दोघांकडून गावठी पिस्टल व एक स्टिलचे मॅगझिन जप्त करण्यात आले आहे.

महिनाभरात शहरातून तीन पिस्टल जप्त केले असून गोळीबार झाल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा संशयितांना सोमवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वाढत्या गुंडगिरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.