फटाके विक्री स्टॉलसाठी तात्पुरत्या स्वरूपात परवानगी घेणे आवश्यक

Jalgaon जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::>दिवाळीनिमित्त तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री परवाना दिली जाणार आहे. त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात ९ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे.

परवाना घेताना विक्रेत्याचा अर्ज व फोटो, चलन, ज्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करावयाची आहे त्या जागेचा ७/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे चा उतारा, ग्रामपंचायतीचा मिळकत उतारा, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचे हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, नगरपालिका हद्दीत असल्यास नगरपालिकेचा अंतिम ना हरकत दाखला, महापालिका हद्दीत असल्यास महापालिका यांचा अंतिम ना हरकत दाखला, ज्या जागेवर फटाके विक्री करावयाची आहे ती जागा ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनचा ना हरकत दाखला घेणे बंधनकराक आहे.