प्रतिनिधी >> पाचोरा‎ तालुक्यातील शिंदाड येथून जवळ‎ असलेल्या पिंप्री प्र.लो. येथील‎ ‎ अल्पभूधारक‎ ‎ शेतकऱ्याने‎ ‎ कर्जबाजारी‎ ‎ पणाला कंटाळून‎ ‎ घराजवळील‎ ‎ चिंचेच्या‎ ‎ झाडाला‎ ‎ गळफास घेत‎ आत्महत्या केल्याची घटना‎ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या‎ सुमारास उघडकीस आली.‎ अल्लाउद्दीन सांडू तडवी (वय ४२)‎ असे आत्महत्या केलेल्या‎ शेतकऱ्याचे नाव आहे.‎

अल्लाउद्दीन तडवी हा‎ अल्पभूधारक शेतकरी असून दोन‎ एकर शेतजमीन आहे. पत्नी, दोन‎ मुले, एक मुलगी सून असा परिवार‎ आहे. शेतजमीन कसून व‎ मोलमजुरी करून हे कुटुंब आपला‎ उदरनिर्वाह चालवत होते.

परंतु‎ यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे‎ शेताचे उत्पन्न हाती आले नाही.‎ झालेला खर्चही हाती न आल्याने‎ ‎ घर संसाराचा गाडा ओढताना‎ दैनंदिन लागणारा खर्च, कधीकधी‎ आजारपण व इतर संकटात‎ लागणारा खर्च यामुळे अल्लाउद्दीन‎ हतबल झाला होता.

म्हणून‎ कुठूनतरी कर्ज काढून संसाराचा‎ गाडा ओढायचा या हेतूने त्याने भारत‎ फायनान्स, स्वतंत्र फायनान्स व ग्राम‎ शक्ती फायनान्स या खाजगी‎ फायनान्सच्या माध्यमातून कर्ज‎ घेतले होते. मोलमजुरी करुन‎ कर्जफेड करू, अशी त्याची अपेक्षा‎ होती.

परंतु अपेक्षेप्रमाणे मजुरी‎ मिळत नसल्याने घरसंसार चालवून‎ बचत गटाचा हप्ता फेडणे मुश्कील‎ झाले होते. परंतु नियमाप्रमाणे बचत‎ गटाचा वसुली प्रतिनिधी‎ कर्जवसुलीसाठी सतत तगादा‎ लावून घराभोवती फिरत होते या‎ सततच्या तगाद्याला तो वैतागला‎ होता.

अल्लाउद्दीन याने‎ कर्जबाजारीपणाला कंटाळून‎ आत्महत्या केल्याची चर्चा सार्वे‎ -पिंप्री गावामधील जनमानसात सुरू‎ आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद‎ करण्यात आली असून‎ आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा‎ पोलिस तपास करत आहेत.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *