पथ विक्रेत्यांना १० हजार रुपये कर्ज देण्यास युनियन बँक ऑफ इंडियाची टाळाटाळ

निषेध फैजपूर सिटी न्यूज

मयूर मेढे, प्रतिनिधी फैजपूर ::> कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊन कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

या योजनेतून १० हजाराचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फैजपूर नगरपरिषदेने केलेल्या सर्वे नुसार लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे सांगितले असून, संबंधित बँक मध्ये अर्ज सादर करून लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. मात्र, येथील युनियन बँक ऑफ इंडिया पथ विक्रेत्यांना आरेवरीची भाषा वापरीत टाळाटाळ करीत आहे.

९९ टक्के पथ विक्रेत्यांचे बचत खाते युनियन बँक ऑफ इंडिया या शाखेत आहे. पथ विक्रेते युनियन बँक ऑफ इंडियाच्या मनमानी कारभाराला वैतागले असून तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन पथ विक्रेते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पथ विक्रेते करीत आहे.

फेरीवाल्यांना वार्षिक ७ टक्के दराने १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मात्र, फैजपूरातील सुमारे ९९ टक्के फेरीवाले या कर्जापासून वंचित राहिले आहे. नगरपरिषदेने केलेल्या सर्वे नुसार २१८ लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहे व संबंधितांना ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितले गेलेले आहे.

अर्ज भरून झाल्यावर अर्ज बँकेत जमा करणे अनिवार्य आहे. मात्र, फैजपूर येथील युनियन बँक ऑफ इंफिया फेरीवाल्यांना उडवाउडवीची उत्तर देत टाळाटाळ करीत असल्याने फेरीवाल्यांनी बँकेत सुरू असलेल्या मनमानी कारभारा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वरिष्ठांनी ठोस पावले उचलणे गरजे आहे. व फेरीवाल्यांना त्यांचे हक्कचे कर्ज त्वरित मिळाले अन्यथा फेरीवाले तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *