गावठी हातभट्टी उध्वस्त, एकाला अटक ; फैजपूर पोलिसांची कारवाई

क्राईम फैजपूर

मयूर मेढे, फैजपूर, फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कासवे (ता. यावल) शिवारातील तापी नदीच्या पात्रात सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी फैजपूर पोलिसांनी नष्ठ करत एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी कच्चे रसायन व दारु तयार करण्याचे साहित्य म्हणजेच २१.५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जगन कौतुक तायडे (रा.कासवे) असे आरोपीचे नाव असून हा कासवे (ता. यावल) शिवारातील तापी नदीच्या पात्रात सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी रचुन पेट्टत्या चुलीवर हातभट्टीची दारू गांळतानां गूळ, मोह, नवसागर, मिश्रित द्रव्य, कच्चे रसायन, व गावठी हातभट्टीची तयार दारू असे अंदाजे किंमत २१.५०० रु.चे मालासह मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध ००४८/२१ महा. दारूबंदी अधिनियम कायदा अन्वये कलम ६५ फ, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कार्यवाही
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहिदास ठोंबरे,एएसआय हेमंत सांगळे, हे.कॉ. सुधाकर पाटील, उमेश सानप, महेश वंजारी, विकास सोनवणे, चेतन महाजन, किरण चाटे यांनी केली.