फैजपुरातील चौघांनी केली कोरोनावर मात

फैजपूर सिटी न्यूज

फैजपूर प्रतिनिधी >> शहरातील इस्लामपुरा भागातील कोरोना संशयिताचा पाच दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. त्याचा पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ झाली, त्यापैकी चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. रथगली भागात बाधीत महिलेच्या संपर्कातील १० जणांना क्वारंटाइन केले आहे. शहरातील डॉक्टर व त्यांच्या पत्नी तसेच सिंधी कॉलनीतील मायलेकी कोरोनामुक्त झाल्या आहेत, असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *