फैजपूर पोलिस ठाणाच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले तर पोलीस प्रशासनाचे मुद्दाम दुर्लक्ष?

क्राईम फैजपूर महाराष्ट्र

फैजपूरचे मटका किंगचे जाळे परिसरात पसरले.

यावल शबीर खान >> यावल तालुक्यातील फैजपूर पोलिस ठाण्याअतंर्गत २८ गावांचा समावेश
आहे. या गावांत खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. यासाठी प्रत्येक गावातून पोलिसांना हप्ता पुरविला जातो अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. गावागावांमध्ये पोलिसांचे पंटर सक्रीय असून दर महिन्याला चोखपणे ही जबाबदारी पार पाडली जाते असेही सूर नागरिकांमधून निघत आहे. गावांमधील अवैध धंदे वाल्यांना राजकीय पाठबळ असल्याने पोलीस या अवैध धंद्यावाल्यांना पाठीशी का घालत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फैजपूर ठाण्यांतर्गत न्हावी, पिळोदे, पाडळसे, वनोली कोसगाय, मारुळ, फैजपूर, पिंपरूड, भोरटेक, अकलुद, कासवे, दुसखेडा, प्र.सावदे, मांगी, रिधोरों, विरोदा, तिळया, मोहमांडली, आमोदा, बोरखेडा बुद्रुक, बोरखेडा गावांच्या समावेश आहे. हिंगोणा, हंबर्डी, बामणोद येथेही खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. भालोद, चिखली, म्हसवाडी या आदी गावाचा समावेश आहे. तसेच पोलिस ठाणे अंतर्गत अनेक गावांमध्ये राजरोसपणे गावठी दारू, मटका, जुगार, सट्टा असे अवैध धंदे सुरू आहेत. या व्यवसायातून लाखांची उलाढाल होत आहे. तसेच अनेकांचे संसार ही उध्वस्त होतांना दिसत आहे.

या धंद्यांना आळा बसला पाहिजे अशी मागणी होत असून खुलेआम सुरु असलेल्या परिसरातील अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गावागावातील अल्पवयीन मुले, तरुण, प्रौढ सुध्दा याच्या आहारी गेली आहेत.

गावांगावामध्ये पोलिसांचे पंटर सक्रीय आहेत. अवैध धंदेवाल्याकडून हप्ते घेऊन ते पोलिसांना पोचवितात. यात दारु, सट्टा, जुगार यांचे हप्त्यांचे वेगवेगळे रेट आहेत. पोलिसांशी थेट संबंध असल्याचे दाखवून पंटर गावात दादागिरी करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. अवैध धंदे बंद व्हावेत, या मागणीसाठी पत्रकारांनी उपोषण केले होते. काही काळ शांतता राहिली, पण नंतर पुन्हा या अवैध धंद्यांचा जोर वाढला आहे. तसेच यापूर्वी ही अनेकांनी अवैध धंदे बंद करण्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली असून ती तक्रार फक्त कचऱ्याच्या कुंडीत पडून असतात. असे अनेकदा झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *