माजी आ.शिरीषदादा चौधरींकडून अमळनेरात स्वखर्चाने अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीन उपलब्ध…

Social कट्टा अमळनेर

अमळनेर : तालुक्यात सध्या कोविड 19 चा थैमान सुरू आहे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील डॉक्टर बांधव तत्परतेने रुग्णाचे निदान करीत असल्याने त्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

सध्याचा काळ राजकरण करण्याचा नाही उलट नागरिक व प्रशासन यांच्यात मेळ घालून देण्याचा आहे. प्रशासनाचे व नागरिकांचे मनोबल वाढवण्याचं काम आपणा सर्वांचे आहे. तसेच कॅन्टोन्मेंट झोन मधील बांधव, व माजी आमदार श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडी च्या नगरसेवकांची निर्जंतुकिकरण फवारणी ची मागणी होत होती त्या अनुशंगाने प्रशासनाला विचलीत न करता आज स्वखर्चाने शहरासाठी 2 अत्याधुनिक निर्जंतुकिकरण फवारणी यंत्र उपलब्ध करून देत आहे. त्याच प्रमाणे त्यास लागणारे निर्जंतुकीकरण रसायन देखील उपलब्ध करून देत आहे. असे माजी आमदार श्री शिरिषदादा चौधरी यांनी सांगितले आहे.

डॉक्टर, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी ,पोलीस व कोरोना वारीयर्स हे घेत असलेल्या मेहनतीचे मी कौतुक करतो आणि जनतेच्यावतीने त्याचा ऋण राहु इच्छितो, “जिथे कमी तिथे आम्ही” ह्या उक्तीप्रमाणे आम्ही या पुढे ही वाटचाल करणार असून अश्या गंभीर परिस्तिथिचे भान ठेवून फक्त राजकारण न करता जनतेची सेवा करण्याची आमची भूमिका असून ति सेवा अहोरात्र करुण करोना ला अमळनेर मधून कोरोना योद्धा चा मदतीने हद्दपार करू असे मा आ शिरिषदादा चौधरी अशी आशा व्यक्त करत नागरिकांनी घाबरून न जाता जागृत राहून कोरोनाचा विरोधातली ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे हा विश्वास व्यक्त करता नागरिकांना संयम, सतर्क राहण्याचा तसेच काहीही अड़चण आल्यास माझ्या कार्यालय त संपर्क करा असे आवाहन श्री चौधरी यांनी या प्रसंगी केले आहे.

यावेळी कार्यसम्राट शिरीषदादा चौधरी, प्रांताधिकारी सीमा अहीरे तहसीलदार मिलिंद वाघ पी, आय अंबादास मोरे ,न पा प्रशासन अधिकारी संजय चौधरी, गटनेते प्रविण पाठक, नरेंद चौधरी, पंकज चौधरी, योगराज सदांनशिव, सुनिल भामरे ,अबु महाजन, किरण गोसावी, किरण पाटील, संतोष पाटील, संतोष लोहेरे, राजु चौधरी, दिनेश चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *