महाविकास आघाडीने जनतेचा भ्रमनिरास केला : आ.गिरीश महाजन

Politicalकट्टा कट्टा जामनेर पाचोरा सिटी न्यूज

जामनेर >> राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचा वर्षभरातच पुरता भ्रमनिरास केल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली. जामनेर येथे मका व ज्वारी खरेदी केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते. पाचोरा रस्त्यावरील कोठारी बंधूंच्या गोदाम परिसरात हे केंद्र सुरू झाले.

आमदार महाजन म्हणाले की, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई हे सरकार देऊ शकले नाही. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर, बाबूराव गवळी, विलास पाटील, डॉ.सुरेश पाटील, रंगनाथ पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, रमेश नाईक, प्रकाश कोठारी हजर होते.