एरंडोल : अंजनी धरणाच्या कालव्याजवळ आढळला मृतदेह

एरंडोल क्राईम

एरंडोल ::> मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अंजन धरणाच्या डाव्या आऊटलेट जवळ अनोळखी मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती मिळताच एपीआय स्वप्नील उनवणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. ओळख पटवण्यासाठी हा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात ठेवला आहे. मृत व्यक्ती सुमारे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील आहे. याप्रकरणी अंजनी मध्यम प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता विकास परब यांच्या खबरीवरून एरंडोलला अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास सहायक फौजदार विकास देशमुख, राजू पाटील हे करत आहे.