एरंडोल भाजप शहराध्यक्षांची बुलेट चोरणाऱ्याला अटक

एरंडोल क्राईम

एरंडोल ::> भाजपचे शहराध्यक्ष नीलेश परदेशी यांची बुलेट चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी मुसळी फाट्याजवळून अटक केली आहे.

पोलिस कर्मचारी संदीप सातपुते यांना चोरीची बुलेट घेऊन एक व्यक्ती मुसळी फाटा (ता.धरणगाव) येथील अर्जुना हॉटेल जवळ उभी असल्याचे समजले. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना दिली.

त्यानंतर सुभाष धाबे, सुनील लोहार हे पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी वराड येथील दीपक पंडित पाटील यास ताब्यात घेतले. दीपकने नाल्यालगत लपवून ठेवलेली बुलेट काढून दिली. मनोज पाटील, अनिल पाटील, काशिनाथ पाटील, राहुल बैसाने, धर्मेश ठाकूर या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.