एरंडोल-निपाणेतील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

एरंडोल

मेंदूविकारासोबत महिनाभराची झुंज थांबली

एरंडोल >> तालुक्यातील निपाने येथील सीआरपीएफमध्ये कार्यरत जवान संदीप रामदास महाजन (वय ३५) यांचे, उपचारादरम्यान नागपूर येथे गुरुवारी निधन झाले. मेंदूच्या विकाराबाबत त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात एक महिन्यापासून उपचार सुरु होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

निपाने येथील सीआरपीएफ जवान संदीप महाजन गेल्या अडीच वर्षांपासून गडचिरोली येथे सेवा बजावत होते. त्यांना मेंदू विकाराने ग्रासल्याने नागपूर येथे महिनाभरापासून उपचार सुरु होते. मंगळवारी दुपारी ही वार्ता निपाने गावात येताच गावावर शोककळा पसरली. जवान संदीप महाजन यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, लहान भाऊ, दोन बहिणी, आठ व अकरा वर्षांची दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर निपाने येथे अंत्यसंस्कार केले जातील.