एरंडोल-नंदगावच्या शिक्षिकेवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक

एरंडोल क्राईम

एरंडोल प्रतिनिधी ::> लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाने शिक्षिकेबरोबर शारीरिक संबंध ठेऊन चार वर्षे अत्याचार केला. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने २७ ऑक्टोबरला एरंडोलला मुख्याध्यापक महावीर गोविंदराव हिंगोले याच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर हिंगोले पसार होता. त्याला ३ नोव्हेंबरच्या रात्री साडेबारा वाजता जळगाव येथे अटक करण्यात आली. त्यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यावर ६ नोव्हेंबर पर्यंत तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली.

नंदगाव (ता.एरंडोल) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भिंगोले यांनी शाळेतील शिक्षिकेस लग्नाचे आमिष दाखवून २ ऑक्टोबर २०१६ ते २३ ऑगस्ट २०१९ असे सुमारे चार वर्षे शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केले. शारीरिक संबंधाचे मोबाईल चित्रण केले, अश्लील फोटो काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून हिंगोले पसार होता. त्यास ३ नोव्हेंबरला मध्यरात्री जळगाव शहरातील खोटे नगरात एरंडोलचे एपीआय स्वप्नील सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, मिलिंद कुमावत, अकील मुजावर यांनी अटक केली. त्यानंतर त्यास ४ नोव्हेंबरला न्यायालयात हजर केले. न्यायाधीश नितेश बंडगर यांनी त्यास पोलिस कोठडी सुनावली.