उद्या जळगावात भाजप करणार वीजबिलांची होळी आंदोलन

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव >> लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाट वीजबिले आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना या बिलांमुळे आर्थिक शॉक बसला आहे.

महाविकास आघाडी सरकारने जनतेला कोणताही दिलासा न दिल्याने भाजपने येत्या २३ नोव्हेंबर रोजी शहरात वीजबिलांची होळी करण्याचे आंदोलन नियोजित केले आहे.

शासनाने लॉकडाऊन काळात दिलेले भरमसाठ वीजबिल माफ करावे किंवा बिलात योग्य सवलत द्यावी या मागणीसाठी भाजप जिल्हा ग्रामीण व महानगरतर्फे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता टॉवर चौक जळगाव येथे वीजबिलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे. यात वीजबिल घेऊन सहभागी होण्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी कळवले आहे.