पक्षात मला त्रास झाला तो केवळ फडणवीस यांच्याकडूनचं हे पुराव्यानिशी सांगतो : माजी मंत्री खडसे

Jalgaon Politicalकट्टा जळगाव

मुक्ताईनगर ::> भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लक्ष्य केले. पक्षात मला त्रास झाला तो केवळ फडणवीस यांच्याकडूनचं झाला. याबाबतचे माझाकडे पुरावे आहेत. ते मी लवकरचं वरिष्ठांसमोर मांडणार आहे आणि जाब विचारणार आहे, असे खडसे म्हणाले.

पुढे बोलताना एकनाथ खडसे यांनी ‘लोक म्हणतात नाथाभाऊ यांचे काही अडकले असेल, म्हणून पक्षात अन्याय होऊनही ते पक्ष सोडत नाहीत, असं काही नाही. मी पक्षाविरोधात कधीही बोललो नाही. माझा जीव पक्षात लागला आहे, म्हणून सहन करतोय, पर्याय भरपूर आहेत असं विधान करत फडणवीसांच्या कारस्थानावर पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुढे बोलताना खडसे यांनी मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्यांच्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची धमक असते. ती धमक माझ्यात आहे, तुम्ही माझी शक्ती आहात. एकटा पडण्याची भीती त्यांना असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते. हांजी-हांजी करुन काही जण तिकीट मिळवतात असंही खडसे म्हणजे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *