“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव >> भाईचंद हिरांचद रायसोनी सहकारी बँकेतील तब्बल 1100 कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले खडसे, शरद पवार साहेबांनी या नाथाभाऊंना आमदार करायचं ठरवलं तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

कालपर्यंत काही लोक असे म्हणत आता एकनाथ खडसे संपले. मात्र, आता तर नाथाभाऊंनी एकच प्रकरण बाहेर काढले तर राज्य हादरल, असेही खडसे म्हणाले. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे बाहेर येतील.

पहिल्या प्रकरणात मोठी राजकीय गँग अडकली आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जण नाही. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असंही एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितलं.