एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

Politicalकट्टा कट्टा रिड जळगाव टीम

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. खडसे पक्षात आल्यास जळगाव जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल. जळगावमध्ये राष्ट्रवादीचे विशेष संघटन नाही. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मराठा आणि लेवा पाटील असे जिल्ह्यात समीकरण जुळून राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा वाढतील, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित ::> खडसे व्हर्च्युअली गुरुवारी भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणार होते, तर मग जळगावहून सुद्धा बैठकीत सहभागी होऊ शकले असते, त्यांना मुंबईत येण्याची काय गरज होती, असा सवाल राष्ट्रवादीच्या मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने केला. तसेच खडसे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

संदर्भ ::> दिव्यमराठी

1 thought on “एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *