मी अर्ज भरला असता तर भाजपचे सात आमदार फुटले असते; खडसेंचा गौप्यस्फोट

Politicalकट्टा जळगाव

जळगाव > विधानपरिषद उमेदवारी निवडीसाठी निवडणूक होवून उमेदवारांची निवड झाली. या विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसकडून ऑफर होती. कॉंग्रेसची उमेदवारी घेवून अर्ज भरला असता तर कदाचित भाजपच्या आमदारांनी मला वोटींग केले असते. या पाच ते सात आमदारांनी तसे स्वतः माझ्याकडे बोलून दाखविल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.

विधानपरिषदेच्या उमेदवार निवड प्रक्रिया नुकताच पार पडली. यात भाजपने विधानपरिषद निवडणुकीत पक्षातील मोठे नेते ज्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत नवीन उमेदवारांना संधी दिली. यामुळे या नेत्यांमध्ये नाराजी आहेच; एकनाथ खडसे यांनी तर तसे उघडपणे नाराजी व्यक्‍त केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाल्याचे देखील खडसे यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *