निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने जनजागृती मंचचे शिवराम पाटील यांच्यावर निंभोरा (ता.रावेर) पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी राष्ट्रवादीचे रावेर सरचिटणीस वाय.डी.पाटील यांनी फिर्याद दिली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फेगडे, सचिन महाले, राहुल सोनार आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात संशयित शिवराम पाटील याने आक्षेपार्ह लिखाण केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सलीम तडवी करत आहेत.