माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी मातोश्रीवरून काही निरोप घेऊन आला आहात का ?

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांना पत्रकारांचा सवाल

रिड जळगाव टीम ::> शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी संजय सावंत २ दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आलेले आहेत. नाथाभाऊ राजकारणातील मातब्बर नेते आहेत, भविष्यातील वाटचालीचा निर्णय योग्य वाटेल तसा ते घेतील आणि तुम्हालाही सुगावा लागेलच, असे सांगत आज शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी नाथाभाऊंची चाचपणी करण्याचा पत्रकारांचा मुद्दा त्यांच्यावरच उलटवला.

आज झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, नाथाभाऊंच्या मुद्द्याला अजून पूर्णविराम मिळालेला नाहीय. त्यांनीही तसे काही स्पष्ट संकेत अजून दिलेले नाहीत. मलासुद्धा माध्यमांच्या माध्यमातून असे काही कळलेले नाहीय भविष्यात ज्या गोष्टी घडतील त्या सर्वांना समजतीलच. भविष्यात काय करायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांपेक्षा नाथाभाऊंना चांगल्या पद्धतीचे माहिती आहे.

माझ्या वर तुमची बारीक नजर आहेच मी कुठे जातो कुणाला भेटतो हे तुम्हाला समजेलच असे सांगत सावंत यांनी खडसे यांच्यासाठी मातोश्रीवरून काही निरोप घेऊन आला आहात का ? या प्रश्नाचे उत्तर देणे थेट टाळले.तसेच जिल्ह्यात दौरा असल्याने शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे एकनाथ खडसे यांची भेट घेणार आहेत का? अशी चर्चा माध्यमांत रंगत असून एक नवे वळण मिळू शकते असे तर्क वितर्क राजकीय वर्तुळासह माध्यमांत लावले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *