एकनाथ खडसेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान नाहीच ; पुन्हा एकदा खडसे चर्चेत

Politicalकट्टा इंडिया कट्टा जगाच्या पाठीवर

रिड जळगाव टीम ::> भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्यात आली, त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना स्थान देण्यात आले आहे, परंतु भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. खडसे यांचे पक्षात पुनर्वसन केले जाईल असे सातत्याने भाजपकडून सांगण्यात येत होते. विधानसभा, राज्यसभा त्यानंतर विधान परिषदेतही त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यांनतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्यांना पुन्हा आज डावलण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत. तसेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा झाल्या मात्र त्यावर खडसे यांनी या चर्चा निष्फळ असल्याचे बोलले होते. आज पुन्हा एकनाथ खडसे चर्चेत आले आहे. ते भाजापाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली त्यात ही त्यांना जागा देण्यात आली नाही. पुन्हा एकनाथ खडसे यांना नाराज करण्यात आले आहे असा सूर राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर यावर एकनाथ खडसे काय बोलणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे व जनतेचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *