माजी मंत्री एकनाथ खडसे भाजप सोडणार का ? पंकजा मुंडे म्हणतात…

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव महाराष्ट्र

रिड जळगाव टीम ::> जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. या चर्चेत आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत न्यूज १८ लोकमत शी बातचीत करतांना म्हणाल्या, ”एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत असं त्यांनी सांगितलं.” तर खडसे राष्ट्रवादीत यावे यासाठी राष्ट्रवादी पायघड्या घालत आहे. तर भाजपनेते मात्र खडसे भाजप सोडणार नाहीत असा विश्वास व्यक्त करत आहेत.

मागील महिन्यात राष्ट्रवादीमध्ये खडसेंच्या पदावरून व आमदारकीवरून चाचपणी देखील झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे. येत्या १७ तारखेला म्हणजेच उद्याला घटस्थापनेच्या मुहूर्तावर माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्या राजकीय घटांची देखील नव्याने स्थापना करू शकतात अशा बातम्यांना जोर आला आहे.

गेल्या काही महिन्यात खडसे भाजपला राम-राम ठोकणार अशा चर्चा होत होत्या. मात्र खडसेंनी अनेक वेळा हुलकावणी दिली असून आता सर्वांच लक्ष येत्या १७ तारखेकडे लागलं आहे. तसेच खडसे यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीच घड्याळ हातावर बांधणार याकडेही लक्ष लागून आहे.