नाथाभाऊंना पुन्हा एकदा शिवसेनेकडून आली ऑफर ?

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर शिवसेना राष्ट्रवादीत चढाओढ!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्ह्याचे भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राजकारणातून सोयीस्करपणे हटविण्यात आल्याचे आरोप स्वतः खडसेंनी काही भाजप नेत्यांवर केले होते. यानंतर अनेकदा विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला महारष्ट्रात अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.

पुढील काही दिवसांमध्ये खड्सेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात असताना आज अचानक पुन्हा एकदा शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने खडसेंच्या शिवसेना प्रवेशाबाबतची देखील चर्चा व्हायला लागली आहे. अहमदनगरमध्ये बोलतांना खोतकर म्हणाले, ‘खड्सेंचे भाजपमध्ये आता त्यांचे राहिले काय आहे ? ते जवळपास बाजूला पडले आहेत. फक्त आता इकडे की तिकडे कुठे जायचे ? हा मुहूर्त त्यांचा ठरायचा आहे. खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांना त्यांचे भलेबुरे कळते. त्यामुळे ते योग्य पक्षात जातील, असे मला वाटते. त्यावर खोतकर यांना खडसे शिवसेनेत येतील का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘हा निर्णय शेवटी त्यांचा आहे. आपण काही म्हणलो तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे.’असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे मातब्बर नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झालेला असून त्यांच्यासोबत खान्देशातील आजी-माजी आमदार व पदाधिकारी जाणार आहेत. मुक्ताईनगरात झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांनुसार, सोमवारी मुक्ताईनगर येथे बैठक झाली. या बैठकीस खान्देशातील धुळे जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे त्यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत ठरल्याप्रमाणे हा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर गेल्या काही महिन्यापासून त्यांचीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती.आता ते सुद्धा खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहे. खडसे यांच्याकडे झालेल्या बैठकीस मीसुद्धा उपस्थित होतो. राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात लवकरच माध्यमांना माहिती देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.