लोकनेते माजी महसूलमंत्री नाथाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशन जळगावच्या वतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये वाफेचे 30 मशीन, मास्क, सॅनिटायझर भेट

Politicalकट्टा मुक्ताईनगर

जळगाव, भुषण जाधव – महाराष्ट्राचे लोकनेते माजी महसूल व कृषिमंत्री श्री.एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त, जळगाव शहरात नाथ फाउंडेशनच्या वतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (कोविड केअर सेंटर) येथे, अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ व रोप देऊन सत्कार करण्यात आला.


त्याचप्रमाणे रुग्णालयास वाफेचे 30 मशीन (व्हेपोरायझर), मास्क, सेनेटायझरच्या बॉटल भेट देण्यात आल्या.


सदरील कार्यक्रम अखिल भारतीय सिंधी साहित्य अँकेडमीचे अध्यक्ष (राज्यमंत्री) आ.डॉ.गुरुमुख जगवाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष मा.नगरसेवक श्री अशोक लाडवंजारी जळगाव मनपा चे मा.गटनेते श्री सुनील माळी, भाजपा युमोचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक फालक, एमआयएमचे नगरसेवक युसुफ हाजी शेख, नाथ फाऊंडेशनचे डॉ.अभिषेक ठाकूर, विनोद मराठे ,भगवान सोनवणे, मिलिंद लोणारी, संजय (गोटू) चौधरी, जमील शहा,योगेश लाडवंजारी,प्रदीप पाटील, वायद भाई खान, उज्वल नाईक , महादेव सोनवणे, सचिन पाटील, कुणाल कुमावत यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *