जळगाव प्रतिनिधी शेख मोहम्मद फिरोज : > शिवाजीनगर परिसरातील मुस्लीम समाजातील बांधवांनी ईद ही साध्या पद्धतीने साजरी करणार असल्याचे मत मुस्लीम समाजाने मांडले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 ला कोणत्याही प्रकारचा सण न मनवता मुस्लीम समाजाने ईद ची नमाज ही आपल्या घरातच राहून अदा केली जाणार आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन न करता आपापल्या घरी राहून नमाज अदा करावी असे मत मुस्लीम समाजातील काही बांधवांनी रिड जळगावच्या प्रतिनिधी कडे बोलून दाखवले आहे. या ईदला आम्ही नवीन वस्तू, साहित्य खरेदी करणार नाहीत. नवनवीन कपडे हे खरेदी करू तर अल्लाह आमच्यावर नाराज होईल असेही मत मांडले आहे. या ईदला जुने कपडे घालून ईद साजरी करणार आहोत असेही मुस्लीम बांधव म्हणाले.
सर्व मुस्लीम बांधवांना ईद मुबारक….