भुसावळ प्रतिनिधी ::> पुणे येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून, भुसावळ येथील डॉ. यामिनी संजय इंगळे सेवा देत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करत आहे. जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णसेवा सुरु ठेवली. यामिनी यांचे एम.बी.बी.एस.चे शिक्षण झाले असून त्या अहोरात्र ती कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या सेवेबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. के.वाय.डी.एस.सी.टी. कॉलेज ऑफ फार्मसीचे (साकेगाव) सचिव संजय इंगळे यांच्या त्या कन्या आहेत.
