डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नैसर्गिक आपत्तीमुळे पाणी साचलेला प्रथमोपचार विभाग अवघ्या 24 तासात रुग्ण सेवेत पून्हा सुरू

Jalgaon जळगाव

जळगाव >> काल सकाळी डॉ उल्हास पाटील रुग्णालयात पावसाचे पाणी आत शिरले होते आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच काही प्रसार माध्यमांनी या प्रकरणाला चुकीची दिशा दिली पण काहींनी खरी माहिती घेऊन प्रदर्शित केली.


ही घटना घडल्याचा काही तासातच स्वतः डॉ उल्हास पाटील हे घटनास्थळी हजर झाले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली व 24 तासाच्या आत हा वॉर्ड स्वच्छ व सॅनेटाईझ करून परत सुरू झाला आहे.

काल ज्या प्रमाणात पाणी हॉस्पिटलमध्ये घुसले होते ते पाहून अस वाटत होतं की 4 ते 5 दिवस हा विभाग सुरू होणार नाही पण हॉस्पिटल प्रशासन हे तातडीने कामाला लागून लगेच JCB बोलावून व रविवार सुटीचा दिवस असताना सर्व स्टाफ बोलावून अवघ्या 24 तासात अपघात विभाग सुरू केलेला आहे.

वरील सर्व माहिती हॉस्पिटल चे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी देताना हॉस्पिटल व्यवस्थापक आशिष भिरुड, नर्सिग स्टाफचे कोमल लांडगे, शिवानंद बीरादार यांचे विशेष सहकार्य, प्रवीण कोल्हे, संकेत पाटील व इतर स्टाफ तसेच कन्ट्रक्शन विभागाचे संजय भिरुड व एन.जी चौधरी त्यांचा स्टाफ ह्या सर्व लोकांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे प्रमोद भिरुड यांनी या सर्वांचे आभार मानले व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *