डॉ. पी. पी. पाटील यांनी दिला कुलगुरू पदाचा राजीनामा

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा रिड जळगाव टीम

जळगाव प्रतिनिधी >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला असून त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तात्पुरता प्रभार देण्यात येणार आहे.

डॉ. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला असून विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला आहे. डॉ. पाटील यांच्या कार्यकाळाला सुमारे सहा महिने बाकी असतांना त्यांनी अचानक राजीनामा का दिला याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तात्पुरता प्रभार देण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायूनंदन हे ८ मार्च रोजी कार्यभार सांभाळणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठातील विविध मुद्यांवरून एनएसयुआय व राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंवर सातत्याने आरोप केले होते. तर अभाविपने त्यांचा बचाव केला होता. या पार्श्‍वभूमिवर, डॉ. पी.पी. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे मानले जात आहे.