रिड जळगाव शहर टीम ::> जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचा आज (दि.२१) रोजी सायंकाळी शहरातील मंगलम हॉल येथे आपल्या निरोप समारंभात आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले माझ्याकडून कुणी दुखावला गेला असेल तर मला माफ करावे. अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांसोबत खरे बोलणे गरजेचे असते. अन्यथा नंतर त्या अधिकाऱ्याचे इंप्रेशन खराब होत असते. माझ्याकडून देखील काही चुका झाल्या असतील. मी कुणावर रागावलो असेल. मात्र तो राग तेवढ्यापुरता होता. आज देखील मी एका कर्मचाऱ्यावर रागावलो. माझ्यापर्यंत कर्मचारी आले. मात्र मी कर्मचाऱ्यांपर्यंत जावू शकलो नाही. याची मला खंत आहे. कुणी कधीही केव्हाही माझ्याकडे मदतीसाठी आल्यास माझी दारे उघडी आहेत, असे पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी निरोप समारंभात बोलतांना सांगितले.