डोंगर कठोरा येथे आठवडे बाजारात नागरिकांनी गोंधळ करून उडवला सोशल डिस्टन्सस्टिंगचा फज्जा

यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी > तालुक्यातील डोंगर कठोरा गावात सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवून दर शनिवारी आठवडा बाजार भरवण्यात आला. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांना ग्रामस्थांनी पायमल्ली घेण्यात आले.

ग्रामस्थानी उडविला सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
ग्रामपंचायत प्रशासन कुचकामी यासंदर्भातील वृत्त असे की राज्यात सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य महामारी आजाराचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून सर्व प्रथम दि.६ मार्च २०२० रोजीच्या ग्रामपंचायत मासिक सभेत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांनी दिलेल्या कोरोना विषाणुसंदर्भात लक्षणे व प्रतीबंध करणेसाठीच्या उपाययोजना संदर्भात सर्व सन्माननीय सदस्यांना माहीती देणेत आली.

त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहानाच्या जनता कर्फ्यू पाळणे संदर्भात ग्रा.प.मार्फत सर्व दुकाने बंद ठेवणे चे व घराबाहेर न पडण्याचे आवहान करण्यात येऊन, कोरोना विषाणु संदर्भात घ्यावयाची खबरदारी बाबत माहीती देणेत येऊन, घरात राहा…. सुरक्षित राहा….. या शासन आदेशाचे पालन करणे बाबत सरपंच,ग्रा.प. सदस्य व पोलिस पाटील यांनी दि. २८ मार्च २०२० रोजी गावात सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आठवडे बाजार भरवावे असे असतांना सुध्दा काही लोकांनी सोशल डिस्टनसिंगचा फर्जा उडविला आहे.

दि. २९ मार्च ते २ एप्रिल २०२० चे दरम्यान गावात सर्वत्र सोडियम हायपोक्लोराईडची पहीली फवारणी करण्यात आली. तसेच दि.७ एप्रिल २०२० रोजी मा.शेखर पाटील प. स. सदस्य यांनी मोफत संपूर्ण गावात टॅक्टर द्वारा सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून दिली.

दरम्यान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे सुचने वरून फॉगीग मशिन खरेदी करण्यात येऊन, संपूर्ण गावात धुरळणी करून घेणे त आली.

अंगणवाडी ताई व मदतनीस यांचे मार्फत गावातील प्रत्येक कूंटूबाचे घरोघरी जाऊन सव्हें क्षण करण्यात येऊन वय ६० वर्षावरील मधुमेह,रक्तदाब, किडनी, ह्रदयविकार,कॅन्सर व तत्सम आजाराचे सव्हेंक्षण करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक कुइंबा करीता ग्रा.प. मार्फत एक (१०० mI) सॅनिटाईझर बॅटल व कुटुंबातील सर्व सदस्या करीता मास्क अंगणवाडी ताई/ मदतनीस मार्फत वाटप करण्यात आले. साधारपणे ४८०० मास्क व ११०० सॅनिटाईझर बॉटल डोंगरकठोरा, डोंगरदे व पायझरी या अतीदूर्गम वस्तीवर सरपंच व ग्रा.प. कर्मचारी यांचे सहकार्याने वाटप केले.
जि.प. शाळेतील मुलांना आहार पुरवठा करण्यात येऊन तसेच आदीवाशी विभागा मार्फत आश्रम शाळेतील शिल्लक धान्य व इतर साहीत्य आदीवाशी कूंट्रंबा ना वाटप करण्यात आले.

डोंगरकठोरा येथील अरूणोदय विद्यालयात पुरूषासाठी दोन व महीलांसाठी एक असे तीन विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येऊन, कक्षात. दाखल करण्यात आलेल्या एकाच कुटूंबातील ५ व्यक्तीना मोफत गहू व तांदूळ देण्यात येऊन ग्रा.प. मार्फत रू ४३०/चा किराणा उपलब्ध करुन देणेत आला.

दि.१६ मे २०२० रोजी दुपार पासुन आठवडे बाजार न भरविणे संर्दभात सरपंच, पोलीसपाटील व स्वतः हा व ग्रा.प.कर्मचारी आव्हान करुन सुद्धा काही गावातील नागरिकांनी सरपंच यांचेशी आरेरावी करून शासकीय कामकाजात अडथळा आणून हमशाही पद्धतीने बाजार भरविला, याबाबत सरपंच यांना पुढील शासकीय कार्यवाही करणे संदर्भात सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की, आपण कोरोना विषाणुचा प्रार्दूभाव रोखणे करीता मेहनत घेऊन सुध्दा नागरिक आपल्याला प्रतिसाथ देत नाहीत, त्यांना त्यांच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी नाही.आपण करित असलेल्या कामाला सहकार्य करीत नाही. प्रत्येकाला मास्क घेऊन सुद्धा मास्कचा वापर करीत नाही.कोरोनाचा प्रार्दूभाव रोखणे हे जरी ग्रा.प.चे कर्तव्य असले तरी सर्व नागरीकांचे सुद्धा कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले दरम्यान अगदी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगोणा गावात कालपरवाच एक 74 वर्षीय महिलाही सदृष्य कोरोना बाधित मरण पावल्याने तरी डोंगरकडा ग्रामस्थांनी अधिक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *