यावल तालुक्यात १२ ग्रामपंचायत सदस्य कर न भरल्याने अपात्र

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा यावल

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील डोंगर कठोरा येथील वेळेत कराचा भरणा न करणार्‍या तब्बल १२ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवत ६ वर्षे निवडणूक लढविण्यासाठी मज्जाव केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डोंगरकठोरा ग्रामपंचायतीची २०१९-२० या वर्षाची डोंगरकठोर्‍याचे १२ ग्रा.पं. सदस्य ६ वर्षांसाठी अपात्रदप्तर तपासणी गटविकास अधिकार्‍यांनी केली असता १३ पैकी १२ ग्रा.पं. सदस्यांनी कर अदा केला नाही, असे निदर्शनास आले.

याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांना पाठवण्यात आला होता. यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे या सदस्यांवर कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रकरणाची ३ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यानंतर दि.१० डिसेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल त्यांनी दिला.

या निकालानुसार डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतीच्या एकूण १३ सदस्यांपैकी सरपंच वगळता इतर १२ सदस्यांनी वेळेत ग्रामपंचायतीचा कर न भरल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

या अपात्र सदस्यांचा कार्यकाळ संपलेला असून, सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. तथापि, या अपात्र सदस्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढता येणार नाही.

यात फक्त यात सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनीच फक्त मुदतीमध्ये शासकीय कराच्या रकमेचा भरणा केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही.