डोंगर कठोरा ग्रामपंचायतवर धडकला महिलांचा मोर्चा

यावल

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील डोंगर कठोरा येथील तडवी आदिवासी भिल्ल महिला, पुरुष गेल्या 30 ते 35 वर्षा पासून गावातील तडवी वाड्याजवळील वड्री रोड वरील बेघर प्लॉट काही वर्षांपासून गावातील शेत जागा मालक यांच्या कडून कच्ची खरेदी करून राहत आहे. तरी त्या जागेचे मालक मयत झाले आहे व जे जीवित आहे ते ह्या तडवी बांधवाना उडवाडावी ची उत्तरे देत असतात तर आता यांनी कोणाजवळ न्याय मागावा. गेल्या 30 ते 35 वर्ष्यापासून त्यांना पाण्याची टणांचाई होत आहे. त्यात आज रोजी ह्या महिला पुरुष ग्रामपंचायत येथे नळ कनेक्शन साठी ग्रामसेवक सी जी पवार यांच्या कडे मागणी केली असता ग्रामसेवक यांनी त्यांना योग्य तो सल्ला दिला.

तसेच वस्तीमध्ये 2 स्त्यांड पोस करून देण्याचा सल्ला दिला कारण ती जागा ग्रामपंचायत नमुना नंबर 8 अ ला लागू नसल्याने तिथे वैयक्तिक नळ कनेक्शन देता येत नाही असे त्यांनी सांगून तडवी आदिवासी महिलांना मार्ग काढून प्रश्न मिटवाला मागणी साठी श्रीमती हलिमा अरमान,इबाब बाई, रशींदा सुपडू, सुपडू तडवी, मुराद समशेर, रमजान मयबू, हुस्मान बुऱ्हाण, ऐमत मैताब, हुशेन नत्थू, नजीर बुऱ्हाण, हुसेन कासम, रशिदा हुशेन, मैमूद बुऱ्हाण, रहेमान सायबू, मेहरबान सुपडू, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.