धुळे >> शहरातील मिल परिसरातील सोन्या मारुती चाळ याठिकाणी आम्लेट बनवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिचा विनयभंग करण्यात आला.

सोन्या मारुती चाळ येथील अल्पवयीन मुलगी घरी असताना राहुल हिरालाल कारंडे (वय २४) याने आम्लेट करून देण्याचा बहाणा करत मुलीला घरात बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून मुलगी घरात आल्यावर राहुलने तिच्याशी अंगलट केली.

तसेच तिचा विनयभंग केला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुल विरुद्ध शहर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *