मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू

क्राईम धुळे माझं खान्देश शिंदखेडा

धुळे >> देवपुरातील लाला सरदार नगरात नातलगांकडे आलेला तरुण दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील जुबेर खान शरीफ खान पठाण (वय २८) हा तरुण लाला सरदार नगरात नातलगांकडे आला होता.

सायंकाळी तोल गेल्याने तो दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्याला नातलग अल्ताफ शेख यांनी हिरे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

डॉ. मुकेश पाटील यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.