धुळे ::> साक्री तालुक्यातील जामदा येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून निजामपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामदा येथील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. त्यानंतर गावातील नितेश जहांगीर चव्हाण याचे नाव समोर आले. नितेशने मुलीला काहीतरी आमिष दाखवले.
या आमिषाला अल्पवयीन मुलगी बळी पडली. नितेशने बुलेटवर बसवून मुलीला पळवून नेले. त्यासाठी त्याला अंकल शामा चव्हाणने मदत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यावरून निजामपूर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनंतर नितेशचा शोध सुरू झाला आहे.