शिंदखेडा तालुक्यातील अजंदे गावात विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे माझं खान्देश

धुळे >> शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रूक गावात महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी ५० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, घरासमोरील पोल वाकल्यामुळे तो धोकेदायक आहे. बाजूला करा असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे मिलिंद शांताराम भावसार, हिरामण भावराव पाटील यांनी दमदाटी केली.

तसेच अंगलट करत विनयभंग केला. तसेच घराजवळील खड्ड्यात महिलेला लोटून दिले. त्यात पीडिता जखमी झाली. हा प्रकार १२ जूनला सायंकाळी घडला होता, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *