बारमध्ये धुडगूस, काउंटरवर फोडल्या बाटल्या, वेटरला मारहाण

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे ::> शहरातील जय परमीट रूम बिअरबारमध्ये तिघा मद्यपींनी शनिवारी दुपारी धुडगूस घातला. शिवाय काउंटरवर येऊन बाटल्या फाेडून वेटरला मारहाण केली.

जय परमीटरूम बिअरबारमध्ये शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे गर्दी होती. टेबल क्रमांक सातवर न्हानू गवळी, कुणाल गवळी व युवराज गवळी (तिघे रा. मोगलाई) हे बसले होते.

या वेळी मॅनेजर शंकर साळवे हे काउंटरवर होते. न्हानू गवळी व इतर दोघे हे दुपारी एक वाजेपासून बसले आहे. आता तीन वाजले तरी ते बसून अाहे, अशी माहिती एकाने वेटर शुभम मासुळे याला दिली.

तिघे जाेरात बाेलत असल्याने त्यांना शुभमने हळू बोला असे सांगितले. त्याचा राग आल्याने न्हानू व इतर दोघे शुभमवर धावून आले.

बिअरच्या बाटल्या फाेडत शुभमला दमदाटी करत मारहाण केली. त्यानंतर इतरांनी न्हानू, कुणाल व युवराज यांना बाहेर काढले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *