धुळे प्रतिनिधी >> आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली प्रेमीयुगुल यांना एकांत करुन देणाऱ्या हॉटेलवर धुळे शहर पोलिंसानी कारवाई केली. या वेळी दोन तरुण व तरुणी या हॉटेलध्ये मिळून आलेत. धुळे शहर पोलिसात याबबत नोंद करण्यात आली आहे.
साक्री रोडला लागून असलेल्या गौरव आईस्क्रीम पार्लर या ठिकाणी प्रेमी युगुलांना बसण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलच्या वरील मजल्यावर पडदे टाकून लहान कंपार्टमेंट करण्यात आली असल्यासचे दिसून आली.
या ठिकाणी दोन प्रेमीयुगुल ही मिळून आले. त्यांना नाव व पत्ता विचारुन पोलिसांनी त्यांच्या पालकांना याबाबत कळवले. तसेच हॉटेल चालकाला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी तरुण व तरुणी यांना समज देवून पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. तर मालकविरुध्द कायदेशीर कारवाई केली आहे. नियमितित पार्लर चालवणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे, असे संकेत दिले आहे.